फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री आयशा खान तिच्या सोशल मीडिया हँडलवर नेहमीच सक्रिय असते. नवनवीन पोस्ट तसेच रिल्सच्या माध्यमातून ती चाहत्यांशी भेट करत असते. अशामध्ये अभिनेत्रीने नुकतीच पोस्ट केलेली इंस्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या चाहत्यांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे की आपल्या लाडक्या अभिनेत्रीने अशी पोस्ट का केली असेल बरे? तर जाणून घेऊयात अशी कोणती पोस्ट अभिनेत्रीने केली आहे?
अभिनेत्री आयशा खानने रविवारी सकाळी एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने तिच्या सध्याची एकंदरीत मनस्थिती मांडली आहे. तिने या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, खरं तर हे कसं व्यक्त करावं, हेच कळत नाहीये… पण आज मला स्वतःबद्दल खूपच कुरूप, निराश वाटतंय. फक्त हे मनातून बाहेर काढावंसं वाटलं, म्हणून लिहिते आहे. आणि जे कुणाला काही दिवस अशाच प्रकारे स्वतःबद्दल वाईट वाटतं, त्यांच्यासाठी एकच गोष्ट मनापासून सांगू इच्छिते की ज्या नर्माईने, ज्या प्रेमाने आपण एखाद्या लहान बाळाशी वागतो, त्याच प्रेमाने आपण स्वतःशीही वागायला हवं. हो, काही दिवस स्वतःवर प्रेम करणं खरंच अवघड जातं, पण आपणच जर स्वतःला समजून घेतलं नाही, आपल्यावर प्रेम केलं नाही… तर मग दुसरं कोण करणार?”
या पोस्टमध्ये जरी तिने लोकांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला असला तरी तिने तिच्या मनाची व्यथा या पोस्टमधून मांडली आहे. त्यामुळे चाहत्यांना तिच्याबद्दल चिंता होत आहे. अभिनेत्री बिग बॉस १७ मध्ये दिसून आली होती. त्या पर्वातील विजेता तिचा बॉयफ्रेंड मुन्नावर फारुकीचा परदाफाश करण्यासाठी ती वाईल्ड कार्ड एंट्रीने आली होती. पण अखेर त्या पर्वाची बाजी मुन्नावरनेच मारली. मध्यंतरी, अभिनेत्री अनेक गाण्यांच्या माध्यमातून दिसून आली होती.