फोटौ सौजन्य - सोशल मीडिया
मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापट हिचं नाव आवर्जून घेतलं जात. प्रिया मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीतही स्वत:चं वर्चस्व तयार करते. मराठी चित्रपट, नाटक, मालिका आणि वेबसीरीजसोबतच प्रिया आता बॉलिवूडमध्ये वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिच्या ‘रात जवां है’ सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला. प्रियासोबत प्रमुख भूमिकेत, अंजली आनंद आणि बरुण सोबतीही आहे. सीरीजमध्ये, प्रियाने सुमनचं, अंजली आनंदने राधिका आणि बरूण सोबतीने अविनाशचे पात्र साकारले आहे.
हे देखील वाचा – आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी, केव्हा उलगडणार गुपित
तीन जीवलग मित्रांची ही कथा आहे. सीरीजबद्दल अभिनेत्री अंजली आनंदन सांगितले आहे. ती म्हणाली, “राधिका माझ्यासारखी नाही, पण तिच्यात असणारे पैलू मी माझ्यात आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तिची भूमिका साकारताना मला स्वत:ची वेगळी बाजू दाखवण्याची आणि अशा शक्तिशाली, स्वावलंबी महिलेकडून शिकण्याची संधी मिळाली. मी तिच्यातल्या आत्मविश्वासाचे आणि स्पष्टपणे मत व्यक्त करण्याच्या तिच्या क्षमतेचे कौतुक करते. मला रियल लाईफमध्ये निश्चितच ‘राधिका’सारखी बनण्याची खूप इच्छा आहे. तसेच सेटवरील सकारात्मक वातावरण आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळे ही भूमिका प्रभावीपणे साकारता आली.”
राधिका हे पात्र सीरीजमध्ये कायमच कोणत्या ना कोणत्या विचारात राहणारं पात्र दाखवलं आहे. स्वत:मध्ये त्रुटी आणि आत्मविश्वासाची कमतरता असताना देखील ती सर्वांना आधार देते, ज्यामुळे तिन्ही मित्रांमधील मैत्री कायम घट्ट राहते.’रात जवां है’ सीरीजच्या ट्रेलरमधून प्रेक्षकांना उत्तम कथानकाची लक्षवेधक झलक देखील पाहायला मिळाली. सीरीजचे कथानक तीन जिवलग मित्र – राधिका (अंजली आनंद), अविनाश (बरूण सोबती) आणि सुमन (प्रिया बापट) यांच्या अनपेक्षित जीवनाला सादर करते, जेथे ते सर्वात रोमांचक प्रवासाची सुरूवात करतात, ते म्हणजे तान्ह्या मुलांचे संगोपन. यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. जी प्रेक्षकांना नव्या अनुभवात पाहायला मिळणार आहे.
यामिनी पिक्चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित सिरीज ‘राज जवां है’चे लेखन आणि निर्मिती ख्याती आनंद – पुथरन यांनी केले आहे. आणि अत्यंत प्रतिभावान सुमीत व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्ये प्रतिभावान स्टार कलाकार आहेत. ‘रात जवां है’ पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्यामध्ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण, हृदयस्पर्शी सीनचा समावेश करण्यात आला आहे. याचदरम्यान, ‘रात जवां है’सह पालकत्वाचा रोमांचक प्रवास पाहण्यासाठी सज्ज राहा आणि सिरीज ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.