जगातील सगळ्यात मोठा मेगा फॅशन इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट गाला फॅशन इव्हेंटला (Met Gala 2024) 6 मेपासून न्यूयार्कमध्ये सुरू झाला आहे. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित मेट गाला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केवळ भारतच नाही तर जगभरातील सेलिब्रिटी आले आहेत. यावेळी मेट गाला 2024 ची थीम ‘गार्डन ऑफ टाइम: ॲन ओड टू आर्ट अँड इटरनिटी’ आहे. प्रत्येक सेलिब्रिटी या थिमला साजेशे कपडे घालून या कार्यक्रमात आले आहे. पण तुम्हाला माहित आहे का या मेट गाला फॅशन इव्हेंटची सुरुवात कधीपासून झाली. चला तर मग जाणून घेऊ या फॅशन इव्हेंटबद्दल.
‘मेट गाला 2024’ची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. फॅशन जगतातील हा एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे. दरवर्षी हा शो मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी MET MONDAY म्हणून आयोजित केला जातो. या वर्षी हा शो सोमवार, ६ मे रोजी आयोजित करण्यात आला असला तरी, भारतातील लोक हा शो आज म्हणजेच ७ मे रोजी पाहू शकतात.
कधी सुरू झालामेट गाला?
रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी हा फॅशन शो आयोजित केला जातो. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टला सपोर्ट म्हणून हा फॅशन शो आयोजीत करण्यात येतो. 1948 मध्ये या इव्हेंटला सुरुवात झाली आणि पाहत पाहत जगभरात हा प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून ओळखला जातो.
मेट गालाची थीम काय आहे?
दरवर्षी मेट गालाची थीम वेगळी असते. थीम आणि ड्रेस कोड भिन्न असतात, परंतु एकमेकांशी संबंधित असतात. या वर्षीचा ड्रेस कोड “द गार्डन ऑफ टाइम” आहे, जे जी बॅलार्डच्या 1962 च्या त्याच शीर्षकाच्या लघुकथेपासून प्रेरित आहे.
भारतीय सेलिब्रिटी कधीपासून सहभागी व्हायला लागले?
जरी मेट गाला जगभरात खूप पूर्वी सुरू झाला होता, 2017 पासून, या फॅशन महमेळाव्यात भारतीय सेलिब्रिटी देखील सहभागी होताना दिसत आहे. भारताकडून पहिल्यांदाच प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. आलिया भट्टने गेल्या वर्षी 2023 मध्ये या शोमधून पदार्पण केलं होते. या वर्षीही आलीयनं साडीमध्ये हजेरी लावत सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं.
Web Title: What is met gala how did it start know the details nrps