33 Years Of Shah Rukh Khan A Look At His Distinctive Honours
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने आपल्या तीन दशकाच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक मोठे चित्रपट दिले आहेत. त्याला इंडस्ट्रीमध्ये ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हटले जाते. या अभिनेत्याने अनेक बड्या अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. असे असूनही, त्याचं कोणत्याही अभिनेत्रीसोबत नाव जोडल्याच्या चर्चा किंवा बातम्या कधीच आल्या नाहीत.
‘सिकंदर’ने मिळवले IMDb 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीत पहिले स्थान!
तीन दशकांहून अधिक काळापासून शाहरुख खान फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. एवढ्या वर्षांत तुझं नाव केव्हाच कोणत्या अभिनेत्रीसोबत का जोडले गेले नाही, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देताना किंग खान म्हणाला की, “मला वाटतं की मी गे आहे. प्रत्येकजण मला विचारतो की, माझं नाव का कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं नाही? बॉलिवूडमधल्या कोणत्याही नायिकेशी संबंध नव्हते का? मला माहित नाही. ते सर्व मित्र आहेत. मी नेहमीच या प्रश्नावर हेच उत्तर देतो. ”
पुढे अभिनेता म्हणाला, “मी त्यांच्यासोबत काम करतो, मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे आणि मी फक्त या सर्व मुलींसोबत काम करतो… मी त्या सर्वांशी खूप संलग्न आहे… मला त्या सर्वांवर प्रेम आहे आणि मी त्यांच्यासोबत खूप वेळ घालवतो. ते माझ्या घरी येतात, मी त्यांच्या घरी जातो. आम्ही एकमेकांचे फोन घेतो आणि बोलतो. आम्ही एकमेकांना व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या मदत करतो कारण आम्ही एकमेकांना समजून घेतो.” असं देखील अभिनेता मुलाखतीत म्हणाला होता.
दरम्यान, २०११ मध्ये शाहरुख आणि प्रियांका चोप्रा यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ‘डॉन’च्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. नाईटक्लब, पार्ट्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये दोघांना वारंवार एकत्र दिसल्याने अफवांना आणखी उधाण आले होते. पण प्रियांकासोबतच्या रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही, असं खुद्द शाहरुखने सांगितले होते. शिवाय अभिनेत्याने स्पष्ट केले होते की, आमच्यात एक चांगली मैत्री आहे. आपल्या पत्नीशी वचनबद्ध राहून, शाहरुखने जाहीरपणे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे अफवांनाही पूर्णविराम मिळाला.
महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे एकाच फ्रेम दिसणार, ‘देवमाणूस’च्या चित्रीकरणाला सुरुवात
शाहरुख खानच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री सुहाना खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. किंग खान पहिल्यांदा लेकीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चाहते देखील किंग खानच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.