Sikandar Movie Poster
मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केलीआहे. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणाऱ्या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले आहे.
सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये क्र. 1 वर असलेल्या ‘सिकंदर’ चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगदोस, यांनी म्हटले, “2025 च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये ‘सिकंदर’ला पहिल्या स्थानी बघून मला अतिशय आनंद वाटत आहे. सलमान खानसोबत काम करणे विलक्षण होते. त्याच्या ऊर्जेमुळे आणि कामाबद्दलच्या निष्ठेमुळे अनेक अर्थांनी सिकंदर जीवंत झाला आहे. आणि हे शब्दांमध्ये सांगता येऊ शकत नाही. हे घडवून आणल्याबद्दल साजिद नाडियदवालाला खूप धन्यवाद. सिकंदरमधील प्रत्येक दृश्य अविश्वसनीय खूण राहील अशा प्रकारे बनवलेले आहे. प्रत्येक क्षण हा चित्रपट लक्षात ठेवेल, अशा प्रकारे मी त्यामध्ये जीव ओतला आहे.” असे त्यांनी सांगितले.
‘हिरामंडी’ फेम अभिनेता गायिका तुलसी कुमारच्या नव्या प्रोजेक्टमध्ये चमकणार; शूटिंगचा Video Viral
2025 चे IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट
1. सिकंदर
2. टॉक्सिक
3. कूली
4. हाऊसफुल 5
5. बाग़ी 4
6. राजा साब
7. वॉर 2
8. L2: एंपुरान
9. देवा
10. छावा
11. कन्नप्पा
12. रेट्रो
13. ठग लाईफ
14. जाट
15. स्काय फोर्स
16. सितारे जमीन पर
17. थामा
18. कंतारा ए लीजंड: चॅपटर 1
19. अल्फा
20. थांडेल
उल्लेखनीय आहे की, जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार 2025 मध्ये रिलीजचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांपैकी ही टायटल्स IMDb ग्राहकांमध्ये सातत्याने सर्वाधिक प्रसिद्ध होती.
विशेष म्हणजे ह्या यादीतील 20 टायटल्सपैकी 11 हिंदी चित्रपट आहेत, तीन तमिळ आणि तेलुगू आहेत, दोन कन्नड आणि एक मल्याळम चित्रपट आहे. या यादीतील तीन चित्रपटांमध्ये अक्षय कुमार प्रमुख भुमिकेत: हाऊसफुल 5 (क्र. 4), कन्नाप्पा (क्र. 11) आणि स्काय फोर्स (क्र. 15) यांसारख्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. रश्मिका मंदानासुद्धा तितक्याच चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. सिकंदर (क्र. 1), छावा (क्र. 10) आणि थामा (क्र. 17). मोहनलाल, प्रभास, पूजा हेगडे आणि कियारा अडवानी प्रत्येकी दोन चित्रपटांतील भुमिकांमध्ये आहेत. या यादीतील पाच टायटल्स प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा चित्रपटाचा दुसऱ्या भाग आहेत. ज्यामध्ये हाऊसफुल 5 (क्र. 4), बाग़ी 4 (क्र. 5), वॉर 2 (क्र. 7), सितारे ज़मीं पर (क्र. 16), आणि कंतारा ए लीजंड: चॅपटर 1 (क्र. 18) या चित्रपटांचा समावेश आहे.
Punjab 95: दिलजीत दोसांझने शेअर केली ‘पंजाब ९५’ ची खास झलक; चित्रपटाच्या टीझर रिलीजची डेट जाहीर!
‘सिकंदर’ कधी रिलीज होणार?
एआर मुरुगादॉस दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मित, ‘सिकंदर’ ईद 2025 च्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.