फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, प्रसिद्ध कॉमेडियन सुदेश लहरी यांनी एका मुलाखतीत विधान केले होते की त्यांनी सलमानला “अरे… मी तुझ्यासारख्यांना ड्राइव्हर ठेवतो” असे म्हंटले होते. पण हे सगळं एका शूटिंग पूर्ती मर्यादित होते. मुळात, सुदेश लहरी यांनी एका मुलाखतीदरम्यान रेडी सिनेमाचा किस्सा शेअर केला आहे.
सुदेश लहरी सांगतात की त्यांना एकदा दिग्दर्शक अनीस बज्मीचा कॉल आला होता. त्याकाळी त्यांचे मुंबईत घर नव्हते. ते हॉटेलमध्ये राहत होते. सुदेश दिग्दर्शकाला भेटण्यास गेले, सिनेमावर बोलणं झालं आणि त्यांना पुन्हा एकदा बोलवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी सुदेश फार घाबरले होते, त्यांना वाटलं की आता सिनेमा हातातून जाणार. पण भेटल्यावर अनीस बज्मी यांनी त्यांना फक्त एक सीन नव्हे तर संपूर्ण सिनेमासाठीच कास्ट केले होते.
या मुलाखतीत सुदेश यांनी सलमानबरोबर घडलेला किस्सा सांगितला. रेडी हा सुदेशसाठी पहिला बिग बजेट सिनेमा होता. त्यात सलमान बरोबर काम करायचे होते. या सिनेमामध्ये त्याला एक डायलॉग देण्यात आला होता. सिनेमात सुदेशला सलमानला इतके म्हणायचे होते की,”अरे… मी तुझ्यासारख्यांना ड्राइव्हर ठेवतो.” सुदेश डायलॉग ऐकूनच घाबरून गेला. त्याला सलमानला अशा शब्दात बोलणे काही योग्य वाटत नव्हते. सुदेशचे म्हणणे होते की किमान दिग्दर्शकाने सलमानला जाऊन सांगावे की अशी अशी डायलॉग आहे पण दिग्दर्शक पण सांगायला तयार नाही. तेव्हा सुदेश स्वतः सलमानकडे गेले आणि त्याला या प्रकरणाविषयी सांगितले.
सलमानने सुदेशचे मनोबल वाढवले. सुदेशच्या मनामध्ये जी भीतीची पाल चुकचुकत होती की “सलमानला हे आवडले नाही तर…, तो रागावला तर…” ती सर्व त्या संभाषणात दूर झाली आणि यशस्वीरीत्या तो सीन शूट करण्यात आला. रेडी सिनेमा आजही लोकांच्या मनामध्ये घर करून आहे.