(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मनोरंजन क्षेत्रातून अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात आशिष तांबे यांची भूमिका साकारणारे अभिनेते आशिष वारंग यांचे आज, ५ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाने त्यांचे सहकारी आणि मित्र शोकाकुल झाले. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे आणि सर्वांना धक्का बसला आहे. अभिनेत्याने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये काम करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.
‘भिकाऱ्याच्या ताटातुनही जेवण परत घेत नाही…’, कुनिका आणि झीशानमध्ये जोरदार राडा
अभिनेता आशिष वारंग यांच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप उघड झालेले नाही. आशिष वारंग यांनी अनेकदा सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. परंतु त्यांचे पडद्यावर प्रत्येक पात्र हे लक्षवेधी ठरले आहे. त्यांनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि रणवीर सिंगसोबत चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
आशिष वारंग यांनी काही उल्लेखनीय बॉलीवूड चित्रपटांमध्ये छोट्या पण संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफसोबत काम केले आहे. अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटात ते सिनियर इन्स्पेक्टर म्हणूनही दिसले. त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाची भूमिका राणी मुखर्जीच्या मर्दानी चित्रपटात होती, जिथे त्यांनी मोरेची छोटी पण प्रभावी भूमिका केली होती.
मलायका अरोराने मुंबईतील एका पॉश भागातील अपार्टमेंट विकले, अभिनेत्रीला झाला एवढ्या कोटींचा नफा
आशिष वारंग यांचे आज ५ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ५५ वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु वृत्तांनुसार, त्यांचा मृत्यू अचानक झाल्याचे समजले आहे. ज्यामुळे मनोरंजन उद्योगाला धक्का बसला आहे. त्यांचे सहकलाकार, मित्र आणि चित्रपटसृष्टीतील लोकांनी त्यांच्या पडद्यावरील उपस्थितीचे कौतुक केले. सोशल मीडियावर त्यांचे चाहते आणि सहकलाकार त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.