वडील पोलिस, बायको डॉक्टर तर स्वत: वकील; बिग बॉस १८ च्या घरात चर्चेत राहिलेले गुणरत्न सदावर्ते कोण आहेत ?
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते चर्चेत आहेत. चार दिवसांमध्ये गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या बोलण्याचा लहेजा, बिग बॉस समोर न डगमगता खंबीरतेने लढण्याची त्यांची शैली चाहत्यांना फार भावतेय. अगदी पहिल्या दिवसापासून बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत ? जाणून घेऊया, शिवाय त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही जाणून घेऊया…
गुणरत्न सदावर्ते यांचे वडील पेशाने पोलिस होते आणि स्वत: गुणरत्न सदावर्ते पेशाने वकील आहेत. ५० वर्षीय गुणरत्न सदावर्ते यांचे कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांची प्रेयसी जयश्रीसोबत लग्न झाले. जयश्री ह्या पेशाने डॉक्टर असून त्यांना कायद्याबद्दल प्रचंड आवड आहे, त्यामुळे ते अनेकदा दोघेही एकत्र दिसत असतात. गुणरत्न आणि त्यांची पत्नी दोघेही करिअरच्या दृष्टीने वचनबद्ध आहेत. अनेकदा सदावर्ते कपलचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात. गुणरत्न आणि जयश्री यांना एक मुलगी आहे, जिचं नाव झेन आहे.
झेन हिने, वयाच्या १० व्या वर्षी १७ लोकांचे प्राण वाचवले होते. २०१८ मध्ये, क्रिस्टल प्लाजा येथे आग लागली होती, त्यावेळी तिने कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्यावेळी झेन तिसऱ्या इयत्तेत शिकत होती. इतक्या मोठ्या आगीत तिने कौतुकास्पद कामगिरी केल्यामुळे तिला राष्ट्रपतींच्या हस्ते, बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २०२२ मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झेन सदावर्तेला बाल शौर्य पुरस्कार मिळाला होता.
हे देखील वाचा- टीव्हीवरील संस्कारी सून रुबिना दिलैकने रॅम्पवर केला कहर, फेकली चप्पल अन्…
गुणरत्न यांचा जन्म महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यात झाला आहे. गुणरत्न यांचे वडील निवृत्ती सदावर्ते पेशाने पोलिस होते. शिवाय त्यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणासोबतही संबंध होता. गुणरत्न लहानपणापासूनच जबाबदारी होते. शाळेतही तो उत्तम विद्यार्थी होते. त्यांना कायद्याच्या शिक्षणात रस होता. अनेकदा वादविवाद आणि सामाजिक समस्यांबद्दलच्या संभाषणांमध्ये भाग घेतला. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि त्यांना आपल्या समाजासाठी योगदान देण्याची इच्छा होती. काही वर्षांपूर्वी गुणरत्न मुंबईत स्थायिक झाले आणि वकिली करू लागले. वकील होण्यापूर्वी ते डॉक्टरही होते. त्यांनी पीएचडी केली आहे.