Doraemon चा आवाज देणाऱ्या अभिनेत्रीचं निधन
ॲनिमेशन इंडस्ट्रीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. डॉरेमॉन कार्टूनमधील एका लोकप्रिय कॅरेक्टरला आवाज देणाऱ्या वॉईस ओव्हर आर्टिस्टचं निधन झालं आहे. ती प्रसिद्ध वॉईस ओव्हर आर्टिस्ट असून ती एक प्रसिद्ध जापानी अभिनेत्रीही होती. जापानी अभिनेत्री नाबुयो ओयामा यांचं वयाच्या ९०व्या वर्षी झालं आहे. अभिनेत्रीचं निधन नेमकं कशामुळे झालं आहे, याबद्दल माहिती नाही.
जापानी अभिनेत्री नाबुयो ओयामाच्या निधनाचे वृत्त एका टॅलेंट संस्थेने शुक्रवारी दिली होती. अभिनेत्रीचं निधन आता झालेलं नसून २९ सप्टेंबरलाच झालेलं आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र मंडळीच उपस्थित असल्याचे वृत्त टॅलेंट संस्थेने दिले. नाबुयो ओयामा यांनी कार्टूनमध्ये बिल्ली रोबोट डोरेमॉनसाठी आवाज दिला होता. २००५ पर्यंत ओयामाने २२ व्या शतकातील बिल्ली डॉरेमॉनला त्यांनी आवाज दिला आहे. ‘डॉरेमॉन’ ॲनिमेशन कार्टून सीरियल जपान, भारतसह अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.
डोरेमॉन ही जास्त दिवस टेलिकास्ट होणाऱ्या जापानी ॲनिमी सीरियल्सपैकी एक आहे. ‘डॉरेमॉन’ सीरियल आजही टेलिकास्ट होतेय. संपूर्ण आशिया आणि इतर भागातही ही ॲनिमी सीरियल प्रसारित केली जाते. ‘डॉरेमॉन’ ॲनिमी सीरियलबद्दल सांगायचे तर, नोबिता नावाच्या आळशी शाळकरी मुलाला दैनंदिन जीवनात येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी प्रेमळ रोबोट मांजर येते. कलाकार फुजिको एफ. Fujio ने तयार केलेले हे कार्टून १९६९ मध्ये पहिल्यांदा मंगा स्ट्रिप्समध्ये दिसले. तेव्हापासून हे कार्टून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाले.