Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉलिवूडवर शोककळा! ‘यूफोरिया’ फेम अभिनेता Eric Dane यांचे ५३ व्या वर्षी निधन; ‘या’ दुर्मिळ आजाराशी झुंज अपयशी

Eric Dane Passed Away: प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी एएलएस (ALS) या आजाराने निधन झाले. 'यूफोरिया' मधील त्यांच्या भूमिकेचे जगभरात कौतुक झाले होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 21, 2026 | 11:47 AM
'यूफोरिया' फेम अभिनेता Eric Dane यांचे ५३ व्या वर्षी निधन (Photo Credit- X)

'यूफोरिया' फेम अभिनेता Eric Dane यांचे ५३ व्या वर्षी निधन (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • हॉलिवूडवर शोककळा!
  • ‘यूफोरिया’ फेम अभिनेताEric Dane यांचे ५३ व्या वर्षी निधन
  • ‘या’ दुर्मिळ आजाराशी झुंज अपयशी
Actor Eric Dane Passed Away: हॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते एरिक डेन (Eric Dane) यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. ‘यूफोरिया’ (Euphoria) या गाजलेल्या मालिकेत ‘कॅल जॅकोब्स’ची भूमिका साकारून त्यांनी जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनामुळे सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून जगभरातील चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
NEW: Actor Eric Dane, who passed away following a battle with ALS, records one final message for his teenage daughters. Dane recorded the interview with Netflix in secret, knowing it would be released after his passing. “Billie and Georgia, these words are for you. I tried. I… pic.twitter.com/hnaXDFLBb1 — Collin Rugg (@CollinRugg) February 20, 2026

दुर्मिळ आजाराने घेतला बळी

एरिक डेन यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदनावारे दिले आहे. एरिक हे ‘एमियोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस’ (ALS) या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने त्रस्त होते. २०२५ मध्ये त्यांना या आजाराचे निदान झाले होते, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातली. आपल्या शेवटच्या क्षणी ते आपल्या पत्नी आणि दोन मुलींसोबत घरीच होते.

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

कुटुंबीयांचे भावूक निवेदन

मिळालेल्या वृत्तानुसार, एरिक यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, “अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की, एरिक डेन आता आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी आयुष्यातील शेवटचे दिवस कुटुंबासोबत घालवले. एएलएस या आजाराशी त्यांनी धैर्याने लढा दिला, पण दुर्दैवाने ती झुंज अपयशी ठरली. त्यांची उणीव आम्हाला नेहमीच भासत राहील, मात्र ते आपल्या अभिनयाच्या रूपाने आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.” यावेळी कुटुंबीयांनी सर्वांना त्यांच्या खाजगीपणाचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे.

९० च्या दशकापासून सुरू झाला होता प्रवास

एरिक डेन यांनी ९० च्या दशकात टीव्ही मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

  • लोकप्रिय मालिका: ‘सेव्हड बाय द बेल’, ‘द वंडर इयर्स’, ‘रोजेन’ आणि ‘मॅरिड विथ चिल्ड्रन’ यांसारख्या शोमधील त्यांच्या कामाचे मोठे कौतुक झाले.
  • चित्रपट कारकीर्द: टीव्ही नंतर त्यांनी आपला मोर्चा मोठ्या पडद्याकडे वळवला. ‘डंकन’, ‘जोई’, ‘जॅक अँड जेन’, ‘फीस्ट’, ‘एक्स-मेन: द लास्ट स्टँड’ आणि ‘मार्ली अँड मी’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
  • ‘यूफोरिया’ मुळे मिळाली नवी ओळख: २०१९ मध्ये सुरू झालेल्या ‘यूफोरिया’ मालिकेत त्यांनी साकारलेली ‘कॅल जॅकोब्स’ ही व्यक्तिरेखा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली.

हॉलिवूडमधील एका प्रगल्भ अभिनेत्याचा असा अकाली निरोप घेणे, ही संपूर्ण मनोरंजन सृष्टीसाठी एक मोठी हानी मानली जात आहे.

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Web Title: Hollywood mourns death of euphoria actor eric dane at 53

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Entertainmenmt
  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

Raja Shivaji Collection : मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणार? ‘राजा शिवाजी’चा १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश
1

Raja Shivaji Collection : मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणार? ‘राजा शिवाजी’चा १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
2

Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.