फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूड अभिनेत्री इशा कोपीकरने नुकतेच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान केलेल्या विधानाने संपूर्ण सृष्टीमध्ये चर्चेचे वातावरण दिसून येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याने इशाला एकदा कानाखाली मारली होती, असे तिने विधान केले आहे. मुख्य म्हणजे एकदा नव्हे तर अभिनेत्याने तब्बल १४ वेळा इशाच्या कानाखाली लावून दिली होती. यानंतर इशाच्या कानाखाली हाताचे वळही उठले होते असे इशाचे म्हणणे होते. नागार्जुनने का म्हणून इशाच्या कानाखाली लावून दिले होते? याबद्दल इशाने स्पष्ट केले आहे.
इशाने मुलाखतीदरम्यान सांगितले की १९९८ साली प्रदर्शित झालेल्या चंद्रलेखा या दाक्षिणात्य भाषी चित्रपटात इशाने अभिनेता नागार्जुनसह काम केले होते. या सिनेमात अभिनेत्याने तिच्या कानशिलात लगावले होते. ते ही १४ वेळा! यामागे कारण असे होते की,” अभिनेता इशाच्या कानशिलात लागवतो असा एक सीन होता. अनेकदा टेक घेतले तरी इशाला तो कानशिलात मार जाणवत नव्हता.
तिच्या चेहऱ्यावर त्या भावना दिसून येत नव्हत्या. त्यामुळे स्वतः इशा अभिनेत्याला सांगते की मला खरोखर कानशिलात मारा.” इशाचे म्हणणे आहे की त्यावेळी नागार्जुन स्वतः इशाला पुन्हा विचारतो की “तू sure आहेस का?” पण इशाच्या परवानगीने नागार्जुन तब्बल १४ वेळा तिच्या कानशिलात लागवतो आणि ते दृश्य यशस्वीरीत्या शूट होते. महत्वाचे म्हणजे यानंतर इशाच्या कानाखाली वळही उठलेले असतात.
हे दृश्य शूट होताच, नागार्जुन स्वतः इशाजवळ येतो आणि तिची माफी मागतो, असे इशाने स्पष्ट केले आहे. इशा मुळात आता काही फिल्म्स तसेच वेब सिरीजमध्ये दिसून आली होती. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘अयालान’ या तामिळ चित्रपटातील तिचा अभिनय चाहत्यांना फार आवडले होते. तर अभिनेत्रीने फिक्सर’ तसेच ‘दहनम’ या वेब सिरीजमध्ये ही उत्तम काम केले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही फार सक्रिय असून तिथे तिचा चाहतावर्ग १.१ M वर पोहचला आहे.