Rajkumar Rao नावात आडनावाचा का वापर नाही करत ? स्वत:च सांगितलं कारण
अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने जेमतेम १० दिवसांतच जगभरात ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. देशासह जगात चित्रपटाचे कौतुक होत असून चित्रपटातल्या कलाकारांचेही सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. अभिनेता राजकुमार रावने चित्रपटामध्ये ‘विक्की’ नावाचे पात्र साकारले आहे. ‘स्त्री २’ ह्या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या आडनावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
सध्या ‘स्त्री २’ चित्रपटातले कलाकार चित्रपटाचं सक्सेस एन्जॉय करताना दिसत आहेत. नुकतंच झालेल्या शुभंक मिश्राच्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याला, “तु बॉलिवूडच्या परंपरेमुळे आपलं आडनाव बदललंय का ?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर अभिनेत्याने मुलाखतीत उत्तर दिले की, “माझ्या अंदाजे तरीही बॉलिवूडमध्ये असा कोणताही नियम नाही. मी आडनाव बदलण्याचं काही तरी वेगळंच कारण आहे. मी माझ्या आयुष्यात केव्हाच आडनावाचा वापर केला नाही. पासपोर्टमध्येही मी माझ्या आडनावाचा वापर केलेला नाही.”
“मी माझ्या नावाच्या पुढे रावचा वापर करण्याचं कारण म्हणजे, कोणत्या राजकुमारची चर्चा होतेय याच्यात लोकांचं कन्फ्यूजन होऊ नये. जसे की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये राजकुमार संतोषी, राजकुमार हिरानी, राजकुमार गुप्ता हे नावं आहेत. राव ही एक उपाधी आहे जी यादवांना दिली जाते. म्हणून मी यादव आडनावाचा वापर न करता माझ्या नावाच्या पुढे रावचा वापर करणं सुरुवात केली. खरंतर मी फक्त पैसा आणि नाव कमवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आलेलो नाही. मला उत्तम कथा असलेल्या चित्रपटांची भूक आहे. म्हणून मी इथे आलोय.” असं अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले.
हे देखील वाचा – ‘या’ कलाकारांच्या घरी आहेत पाळीव कुत्रे, स्वतः पेक्षा जास्त घेतात प्राण्याची काळजी!
‘स्त्री २’ चित्रपटावर १० दिवसांत प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आहे. तर वरूण धवन चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार आहे. शिवाय तमन्ना भाटियाने चित्रपटामध्ये अफलातून डान्स करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. जेमतेम ५० ते १०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ह्या चित्रपटाने १० दिवसांत जगभरामध्ये ५०५ कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने बजेटच्या ४-५ पटीने जास्त कमाई केली आहे.