Singhasan Khali Karo
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ रिलीजच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत ट्रेलरनंतर अभिनेत्रीने आता कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ‘सिंहासन खाली करो’ हे चित्रपटामधील पहिले गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात देशभक्ती आणि संघर्षाची भावना दिसून येत आहे. ‘सिंहासन खाली करो’ या गाण्याबद्दल बोलायचे तर ते चित्रपटाच्या थीमला अनुसरून तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय चित्रित करण्यात आला आहे. एकीकडे स्वातंत्र्याच्या लढ्याची भावना या गाण्यातून दिसून येते, तर दुसरीकडे सत्तेच्या विरोधात उभे राहण्याचा गुपित संदेशही या गाण्यातून दिसून येत आहे.
कंगनाने ‘सिंहासन खाली करो’ गाणं केले प्रदर्शित
कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘इमर्जन्सी’ रिलीज करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा निर्दयी अत्याचारी विद्रोहाला भेटतो, तेव्हा ‘सिंहासन खाली करो’चे प्रतिध्वनी एक राष्ट्रगीत बनते.” असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. आणीबाणीच्या काळात सार्वजनिक अशांततेचे प्रतिध्वनीत, गाण्याचे बोल बदल आणि त्यागाची मागणी करत आहेत. ‘सिंहासन खाली करो’ हे गाणे उदित नारायण, नकल अझीझ आणि नकुल अभ्यंकर यांनी गायले आहे. तर, मनोज मुंतशीर यांनी गीते लिहिली आहेत.
चाहत्यांचा मिळाला प्रतिसाद
‘सिंहासन खाली करो’ या गाणं कंगनाने शेअर करतानाच चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरणार हे देखील सांगितले आहे. तर अनेक चाहत्यांना अभिनेत्री कंगना राणौतला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पाहून आनंद झाला आहे. तसेच, हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
हे देखील वाचा- International Dog Day 2024: ‘या’ कलाकारांच्या घरी आहेत पाळीव कुत्रे, स्वतः पेक्षा जास्त घेतात प्राण्याची काळजी!
कधी रिलीज होणार हा चित्रपट
ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वजण इमर्जन्सी रिलीजसाठी आतुर असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे. कंगना राणौत व्यतिरिक्त या चित्रपटात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, अनुपम खेर, सतीश कौशिक, विशाक नायर आणि मिलिंद सोमण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत काम करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत.