ज्या खटल्याने देशाचं भविष्य बदललं, त्या 'शाहबानो केस'वर चित्रपट येणार; 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका!
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षक दमदार प्रतिसाद देताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर सत्य घटनेवर आधारित आणि बायोग्राफिकल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘आर्टिकल ३७०’ सारखे चित्रपट रिलीज झाले होते. या चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
दरम्यान, या वर्षीही एका सत्य घटनेवर आधारित एक मोठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या घटनेनं भारताचं एका प्रकारे भविष्यच बदललं होतं. हिच घटना आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, सत्य घटनेवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘मी गे आहे…’, शाहरुख खान भर कार्यक्रमात असं का म्हणाला?
शाह बानो यांनी मुस्लिम पर्सनल लॉ मधील एका कायद्याला आव्हान दिलं होतं. शाह बानोच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमी दिसणार आहे. मोहम्मद अहमद खान हे शाहबानो यांचे पती होते. त्यांनी ट्रिपल तलाकच्या माध्यमातून ६२ वर्षीय शाहबानो यांना तलाक दिला होता. त्यानंतर शाहबानो यांनी पोटगीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मोहम्मद खान यांनी पोटगी देण्यास नकार दिला होता. मी मुस्लीम पर्सनल लॉच्या मदतीने हा तलाक दिलेला आहे, त्यामुळे मी पोटगी देण्यास बांधील नाही, असे मत त्यांनी मांडले होते. महिलेला पोटगी फक्त इद्दतच्या वेळीच दिली जाते, असाही दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हा खटला साधारण सात वर्षे चालला. एप्रिल १९५८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो यांच्या बाजूने निकाल देत हा खटला मार्गी लावला होता. या निकालानंतर भारतीय समाजकारण बदलले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक होता.
यामी गौतमने गेल्या वर्षी बाळाला जन्म दिला, त्यामुळे सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री यामी गौतम शेवटची ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात दिसली होती. आई झाल्यानंतरचा तिचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. असे असताना आता अभिनेत्रीने या चित्रपटासाठीची तयारी चालू केली आहे. चित्रपटात यामी गौतम ६२ वर्षीय शाहबानोची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका जिंवत व्हावी यासाठी यामी गौतम आतापासूनच तयारीला लागली आहे. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामी गौतमच्या अपकमिंग चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चर्स, विशाल गुरनानी आणि जूही पारेख मेहता करणार आहेत. शिवाय, ‘द फॅमिली मॅन २’चे दिग्दर्शक सुपर्ण वर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. सध्या प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची आहे.