(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेता रजनीकांत ‘जेलर २’ या चित्रपटातून पडद्यावर चमकणार आहे. या चित्रपटाचा घोषणा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रजनीकांत अॅक्शन पोजमध्ये दिसत आहेत. वयाच्या ७४ व्या वर्षीही तो पडद्यावर दमदार अॅक्शन दाखवताना दिसत आहे. तसेच या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांमध्ये आता हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मकर संक्रांतीनिमित्त रजनीकांत यांनी चाहत्यांना दिली खास भेट
२०२३ मध्ये रजनीकांतचा ‘जेलर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली. आता निर्माते ‘जेलर २’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. पोंगल आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने निर्मात्यांनी ‘जेलर २’ चा टीझर रिलीज करून रजनीकांत यांनी चाहत्यांना एक भेट दिली आहे. तसेच आता या चित्रपटाचा जबदस्त टिझर रिलीज झाला आहे.
‘सिकंदर’ने मिळवले IMDb 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीत पहिले स्थान!
रजनीकांतने बंदूक आणि तलवारीने शत्रूंवर हल्ला केला
टीझरमध्ये रजनीकांत त्यांच्या परिचित शैलीत, चष्मा घालून आणि त्यांच्या शत्रूंना पराभूत करताना दिसत आहेत. टीझरच्या सुरुवातीला ‘जेलर २’ चे दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध नवीन पटकथेवर चर्चा करताना दिसत आहेत. अचानक सगळीकडे गोळीबार आणि तोडफोड सुरू होते. मग रजनीकांत एक धमाकेदार एन्ट्री करतो. एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन, रजनीकांतने प्रवेश केला आहे. या टीझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
‘मी गे आहे…’, शाहरुख खान भर कार्यक्रमात असं का म्हणाला?
प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला
टीझरचा एकूण कालावधी चार मिनिटे आहे आणि तो खूपच मनोरंजक आहे. ‘जेलर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा रजनीकांतच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. दुसऱ्या भागाबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तो प्रदर्शित होऊन २४ तासही झाले नाहीत आणि त्याला आधीच साडेसात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘जेलर २’ व्यतिरिक्त, रजनीकांत ‘कुली’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये आमिर खानचा कॅमिओ पाहायला मिळणार आहे.