
मानसिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या Zindaginama चा ट्रेलर रिलीज, वेबसीरीजमध्ये दिसणार आघाडीचे मराठी कलाकार
मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट्स मुळे चर्चेत आहे. ‘विस्फोट’ आणि ‘रात जवानी है’ नंतर तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. तिच्या नव्या प्रोजेक्टचा ट्रेलर लाँच झालेला आहे. अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता श्रेयस तळपदेच्या ‘जिंदगीनामा’ सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सहा कथानकांचा मिळून या सीरिजची कथानक करण्यात आली आहे. सध्या ह्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे..
प्रिया आणि श्रेयस मुख्य भूमिकेत असलेल्या सीरिजचा ट्रेलर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दोघांच्याही विशेष भूमिकेची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत असून ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय. ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरीज रिलीज होणार असून मानसिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या सीरीजमध्ये वेगवेगळ्या सहा कथा दाखवण्यात आल्या आहेत. सीरीजमध्ये अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहेत. प्रिया बापट आणि श्रेयस तळपदेसोबतच अभिनेत्री उर्मिला कोठारेही मुख्य भूमिका साकारणार आहे.
पहिल्यांदाच ओटीटी विश्वात सहा कथानकांची एक वेबसीरीज करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सीरीजचं दिग्दर्शन अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी केलं आहे. विशेष म्हणजे, मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनीही या सीरीजमधील एका कथानकाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अप्लॉज एंटरटेन्मेंटने या सीरीजची निर्मिती केली आहे. श्रेयस तळपदे, प्रिया बापट आणि उर्मिला कोठारे यांच्यासोबतच प्राजक्ता कोळी, लिलित दुबे, सुमीत व्यास, अंजली पाटील, इवांका दास, मोहम्मद समद, शिवानी रघुवंशी हे लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत.
हे देखील वाचा – सासू आणि जावयाची धमाल जुगलबंदी ‘पाणीपुरी’ चित्रपटात रंगणार…