औरंगाबादचे ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवी यात्रेला घटस्थापने पासून सुरुवात होणार आहे. कर्णपुरा देवी बाबत औरंगबादेसह मराठवाड्यात अनोखी धार्मिक श्रध्दा आहे. दरवर्षी नवरात्रात हजारोंच्या संख्येने भाविक या मंदिरात हजेरी लावतात आणि कर्णपुरा देवचं भक्ती भावाने दर्शन घेतात. नवसाला पावणारी ही देवी आई आहे अशी मराठवाड्यातील भाविकांची समज आहे. अनेक वर्षांपासून नवरात्रा दरम्यान कर्णपुऱ्यात यात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात खरेदीच्या सामग्रीची दुकानं, हॉटेल्स, लहान मुलांसाठी झोपाळे अशा विविध गोष्टींची रेलचेल असते. तरी मराठवाड्यातील नागरीक या यात्रेची उत्सुकतेने वाट बघतात.
या वर्षी कर्णपूऱ्यात पार पडणाऱ्या यात्रोत्सवाला विशेष महत्व आहे. कारण या वर्षी हा उत्सव तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर गेली दोन वर्ष हा उत्सव साजरा करण्यात आला नाही म्हणून या वर्षी कुठल्याही निर्बधांशिवाय हा उत्सव पार पडणार आहे. तरी प्रशासानाकडून या भव्य यात्रेबाबत विशेष नियमावलीसह विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. धार्मिक उत्सव शिवाय जास्तीत जास्त भाविकांसाठी जागरण गोंधळ, रुग्णवाहिका सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हिंदू जनजागृती प्रदर्शनी, आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
तरी या भव्य जत्रेच्या पार्श्वभुमिवर शहरातील विविध वाहतुकीचे मार्ग बदलवण्यात आले आहेत. जड वाहनांना या परिसरतून प्रवेस नाकारण्यात आला आहे. तसेच कर्णपुरा परिसरात पार्कींची विशेष सोय करण्यात आली आहे. भाविकांनी या यात्रेस उत्सफूर्त प्रतिसाद दाय्वा असं आवाहन राजकीय पक्षांकडून करण्यात आलं आहे.