8 सुपरस्टार, कोट्यवधींची कमाई तरीही फ्लॉप ठरला हा चित्रपट!
आपण ज्या चित्रपटाविषयी बोलत आहोत, त्या चित्रपटाचे नाव आहे कलंक, जो 2019मध्ये चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला होता
या चित्रपटात तब्बल 8 सुपरस्टार होते. चित्रपाटाच्या शेतीसाठी करोडो रुपये देखील खर्च करण्यात आले. एवढेच काय तर, याचे दणदणीत प्रमोशन देखील करण्यात आले होते तरीही प्रेक्षकांनीच या चित्रपटाकडे पाठ फिरवली
हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो फार काही जादू दाखवू शकला नाही. बॉक्स ऑफिसवरही याने फारशी काही कमाई केली नाही
या चित्रपटाक संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन आणि आलिया भट्ट ही तगडी स्टारकास्ट होती. इतकी लोकप्रिय स्टारकास्ट असूनही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला
या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांनी केलं होतं. तर करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला या चित्रपटाचे हे निर्माते होते
या चित्रपटासाठी तब्बल 140 कोटींचे बजेट तयार करण्यात आले होते. हा चित्रपट हिट होईल अशी अपेक्षा होती मात्र तसे घडले नाही आणि हा चित्रपट अयशस्वी ठरला