Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा' हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता पुनीत इस्सर देखील झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 02, 2026 | 02:58 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • आग्रा स्वारीवर आधारित भव्य ऐतिहासिक चित्रपट
  • ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये पुनीत इस्सर यांची भूमिका
  • रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आणि ऐतिहासिक आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ एक कथा नसून, शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा थरारक अध्याय उलगडून दाखवतो. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी यांच्या संयुक्त निर्मितीत तयार झालेला तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित

या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पुनीत इस्सर एका अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली आणि निर्णायक व्यक्तिरेखेत दिसणार असून, त्यांच्या अनुभवी आणि भारदस्त अभिनयामुळे या भूमिकेला विशेष खोली लाभली आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ राजकीय सत्तेचे प्रतीक नसून, त्या काळातील रणनीती, कूटनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.

महाभारत मालिकेतील दुर्योधनाच्या संस्मरणीय भूमिकेसह अनेक दमदार व्यक्तिरेखांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या चित्रपटातून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसणार आहेत. भव्य सेट्स, सशक्त पटकथा आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

Pak मध्ये बंदी असूनही, ‘Dhurandhar’ नेटफ्लिक्सच्या टॉप चार्ट लिस्टवर; शेजारच्या देशात भारतीय चित्रपटाचा डंका!

या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी) आणि मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) आहेत. सहनिर्माते म्हणून रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा (मुगाफी) यांनी जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिककडे देण्यात आली असून, पॅनोरमा स्टुडिओजकडून हा चित्रपट जगभरात (वर्ल्ड वाईड) प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Web Title: Puneet issar plays a significant role in ranpati shivray swari agra marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
1

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
2

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
3

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
4

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.