2 वर्षांपूर्वीचा तो चित्रपट, ज्याने गाजवलं होतं बॉक्स ऑफिस! 700 कोटींची कमाई अन् अजूनही ओटीटीवर घालतोय धुमाकूळ
2023 मध्ये साउथचा सुपरस्टार प्रभासची जबरदस्त अॅक्शन थ्रिलर ड्रामा फिल्म ‘सालार’ प्रदर्शित झाली होती. गेल्या 2 वर्षांपासून हा प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील होते, ज्यांनी यापूर्वी ‘केजीएफ’ सारख्या हिट चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘सालार’ चे डिजिटल राइट्स वेगवेगळ्या भाषांमध्ये विकण्यात आले होते.
हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तेलुगू, तमिल, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज करण्यात आला. तर हिंदी वर्जन जियो हॉटस्टारवर स्ट्रिम करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हिंदी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे.
सुमारे ४०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे ७०० कोटी रुपये कमावले.
या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त अनेक अद्भुत कलाकार दिसले, ज्यात श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत होते. याशिवाय जगपती बाबू, बॉबी सिम्हा आणि श्रिया रेड्डी देखील दिसले.
हा चित्रपट जिओ हॉटस्टारवरील टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये सातत्याने कायम आहे. इनसाईड बॉक्स ऑफिसने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिले की, हा चित्रपट एक अनोखा ब्लॉकबस्टर आहे, जो इतक्या काळापासून ओटीटीवर आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवरील टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये सातत्याने कायम आहे. इनसाईड बॉक्स ऑफिसने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिले की, हा चित्रपट एक अनोखा ब्लॉकबस्टर आहे, जो इतक्या काळापासून ओटीटीवर आहे.