World Most Profitable Film: जगातील पहिला चित्रपट ज्याने मूळ बजेटच्या 45 पट केली कमाई
2024 साली अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपला करिष्मा दाखवला मात्र या सालचा सर्वात प्रॉफेटेबल चित्रपट कोणता ठरला ते तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटाने नफ्याच्या बाबतीत 1700 कोटी रुपयांच्या पुष्पा 2 चाही पराभव केला
जागतिक बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे तर, या वर्षी इनसाइड 2, डेडपूल ते जोकर 2 असे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. काही सुपरडुपर हिट ठरले, तर जोकर 2 सारख्या चित्रपटांनी निराशा केली
पण वर्ष 2024 मधील सर्वात फायदेशीर चित्रपट 'टेरिफायर 3' होता ज्याने बॉक्स ऑफिसवर सर्वांना पछाडून ठेवले. याने अनेक विक्रमही मोडले. हा एक हॉरर चित्रपट आहे, ज्याने आपल्या बजेटपेक्षा 45 पट अधिक नफा कमावला
हा चित्रपट 2 दशलक्ष डॉलर्समध्ये (सुमारे 17 कोटी रुपये) बनवण्यात आला. पण बॉक्स ऑफिसवर याने जगभरात $90 दशलक्ष (रु. 768 कोटी) चा टर्नओव्हर केला. याचाच अर्थ त्याची उलाढाल 45 पट अधिक होती
या अर्थाने, 'टेरिफायर 3' हा 2024 सालचा जगातील सर्वात नफा कमावणारा चित्रपट ठरला आहे. जर आपण वर्ष 2024 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाबद्दल बोललो तर तो 'इनसाइड आउट 2' होता ज्याचे बजेट 200 दशलक्ष डॉलर्स होते