Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट

टीव्ही अभिनेता शशांक केतकरने दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे बुडवल्याचे अनेक आरोप केल्यानंतर आता याच अभिनेत्याने त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 08, 2026 | 10:58 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या
  • आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट
  • शशांक केतकरने दिग्दर्शक मंदारला दिल्या शुभेच्छा
 

मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता शशांक केतकर हा केवळ त्याच्या दमदार अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड स्वभावासाठीही ओळखला जातो. एखादी गोष्ट मनासारखी नसेल, अन्यायकारक वाटत असेल किंवा खटकत असेल, तर ती गोष्ट तो कोणताही विचार न करता सोशल मीडियावर मोकळेपणाने मांडतो. वैयक्तिक अनुभव असोत किंवा सामाजिक विषय, शशांक नेहमीच ठाम भूमिका घेताना दिसला आहे.

काही काळापूर्वी शशांक केतकरने प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एका मालिकेच्या मानधनाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे शशांकने सोशल मीडियावर थेट चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्या चॅटमध्ये मंदार देवस्थळी ‘लवकरच पैसे परत देईन’ असे आश्वासन देताना दिसत होते. मात्र वारंवार मुदत देऊनही पैसे न मिळाल्याने शशांकने कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. या प्रकरणामुळे मराठी इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली होती आणि अनेक कलाकारांनीही अशाच अनुभवांबाबत उघडपणे बोलण्यास सुरुवात केली होती.

केतकी माटेगावकरची ‘रुबाब’ला दाद; मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचे अभिनेत्रीने केले आवाहन

या वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नसतानाच, आता शशांक केतकरने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नुकताच दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचा वाढदिवस साजरा झाला आहे. ज्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोर्टात खेचण्याची भाषा शशांक करत होता, त्याच व्यक्तीसाठी त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे देताना दिसला आहे. आणि त्या देखील अत्यंत अनोख्या आणि चर्चेचा विषय ठरणाऱ्या पद्धतीने त्याने या शुभेच्छा दिल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला मंदार देवस्थळी यांच्यावरील एक जुना लेख सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याने दिग्दर्शकाला शुभेच्छा दिल्या आहते. त्या लेखामध्ये मंदार देवस्थळी यांना ‘डार्लिंग दिग्दर्शक’ असा उल्लेख करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसल्या आहेत. वृत्तपत्राचा फोटो शेअर करताना शशांकने लिहिले, “तुझ्याबद्दलचा एक जुना आर्टिकल! जगाला काहीही वाटू दे… माझ्यासाठी तेव्हाही तू एक उत्तम दिग्दर्शक होतास आणि आजही आहेस.”

धर्मेंद्र यांच्या ५३ वर्षे जुने हिट गाण्याचा रिमेक; चाहत्यांना राग अनावर, म्हणाले ‘प्रसिद्ध गाण्याचा अपमान..’

शशांकची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. काही जणांनी त्याच्या मोठ्या मनाचे आणि प्रोफेशनल दृष्टिकोनाचे कौतुक केले, तर काहींनी मात्र या पोस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘पैसे अडकले असताना वाढदिवसाच्या शुभेच्छा का?’ असा प्रश्न अनेक चाहते त्यांना करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, शशांक केतकर आणि मंदार देवस्थळी यांची व्यावसायिक जोडी पूर्वी खूप गाजली होती. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘होणार सुन मी या घरची’ ही मंदार देवस्थळी यांनीच दिग्दर्शित केली होती आणि या मालिकेमुळे शशांकला घराघरात ओळख मिळाली.

त्यानंतर दोघांनी कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतही एकत्र काम केले. मात्र याच मालिकेच्या मानधनाबाबत वाद निर्माण झाल्याचे शशांकने स्पष्टपणे सांगितले होते. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप मंदार देवस्थळी यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र शशांक केतकरने केलेली ही वाढदिवसाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: Shashank ketkar wished director mandar devasthali on his birthday calling him an excellent director

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • shashank ketkar

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.