पद्मश्री ते डॉक्टरेट... ३३ वर्षांच्या कारकीर्दीत शाहरुख खानला किती पुरस्कार मिळाले
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
२००५ मध्ये भारत सरकारतर्फे शाहरुख खानला देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री'प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या मोलाच्या योगदानासाठी अभिनेत्याचा सन्मान करण्यात आला.
शाहरुखला लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या इतक्या मोठ्या फिल्मी करियरसाठी 'पार्दो आला कारिएरा' ह्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१० मध्ये बर्लिन टाउन हॉलच्या गेस्टबुकवर स्वाक्षरी करणारा पहिला भारतीय अभिनेता बनला. तसेच, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून सामाजिक कार्यासाठी 'क्रिस्टल अवॉर्ड' आणि लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 'ग्लोबल डायव्हर्सिटी अवॉर्ड' ने गौरवण्यात आले होते.
२०११ मध्ये टोरांटो येथे झालेल्या IIFA पुरस्कार सोहळ्यात शाहरुखला "My Name is Khan" या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या चित्रपटामुळे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर कौतुकाची छाप पडली.
शाहरुख खानला ट्रोब युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियाकडून ऑनरेरी डॉक्टरेट पदवी मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता होता. मीर फाउंडेशनच्या माध्यमातून स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी, अॅसिड अटॅक पीडित महिलांसाठी आणि गरजू मुलांसाठी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
२०११ मध्ये शाहरुख खानला युनेस्कोचा प्रतिष्ठित 'पिरामिड कोन मार्नी' पुरस्कार देण्यात आला. शिक्षण आणि आरोग्यासाठी त्याने केलेल्या दीर्घकालीन कार्यासाठी हा पुरस्कार त्याला मिळाला.
२०१४ मध्ये ब्रिटिश संसदेकडून 'ग्लोबल डायव्हर्सिटी अवॉर्ड' देऊन शाहरुखला सन्मानित करण्यात आले. विविध संस्कृतींना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आणि जागतिक सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
शाहरुख खानला अमेरिकेच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीने जगातील सर्वाधिक प्रभावशाली ५०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे. फ्रान्स सरकारने देखील त्यांना दोन प्रमुख पुरस्कारांनी गौरवले आहे, २००७ मध्ये ‘ऑर्ड्रे दे आर्त ए दे लेत्र’ (कलेसाठीचा राष्ट्रीय सन्मान) आणि २०१४ मध्ये ‘लीजन ऑफ ऑनर’, जो फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.