जीमला जाताय? हे खा आणि तंदरुस्त व्हा. (फोटो सौजन्य - Social Media)
प्रथिनांनी समृद्ध, स्नायूंची दुरुस्ती आणि वाढीसाठी फायदेशीर असलेले उकडलेले अंडी खा. व्यायामशाळेत जाणाऱ्यांसाठी उकडलेल्या अंड्यांचे सेवन फार फायद्याचे ठरते.
जिमला जाणाऱ्या लोकांनी ओट्सचे पोषणमूल्य घेणे फार फायद्याचे आहे. कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा उत्तम स्रोत असलेले ओट्स जीमपूर्व ऊर्जा देतो.
हेल्दी फॅट्स आणि प्रथिनांसाठी उपयुक्त असलेले भाजलेले बदाम व्यायामानंतर स्नायूंना पोषण देते. याचे सेवन नक्की करा.
केळी या फळामध्ये नैसर्गिक साखर आणि पोटॅशियम भरपूर असल्याने त्वरित ऊर्जा मिळते. व्यायामशाळेत जाणाऱ्या लोकांमध्ये केळी खाण्याचे प्रमाण जास्त असते.
कमी फॅट आणि उच्च प्रथिनांचा स्रोत म्हणून ग्रील्ड चिकनकडे पाहिले जाते. याचे सेवन स्नायूंच्या विकासासाठी महत्त्वाचे असते.