Abhijeet Sawant Meets Amitabh Bachchan: ‘इंडियन आयडॉल’चा पहिला विजेता आणि लोकप्रिय गायक अभिजीत सावंत याला महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेण्याची खास संधी मिळाली. सोनी टीव्हीवरील ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष भागाच्या शूटिंगसाठी अभिजीत सावंत आणि माधुरी दीक्षित उपस्थित होते.
Abhijeet Sawant Meets Amitabh Bachchan (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

नुकताच सोनी टीव्ही ने बिग बी अमिताभ बच्चन यांचा हिंदी “कोण होणार करोडपतीच्या? “ सेटवर खास वाढदिवस साजरा केला असून इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकार या खास सोहळ्यासाठी जमले होते. सेटवरच्या या खास एपिसोड शूट साठी माधुरी दिक्षीत , गायक अभिजीत सावंत यांची विशेष उपस्थिती देखील बघायला मिळाली.

आजवर सगळ्यांनी अभिजीतच्या आवाजाची जादू अनुभवली आहे पण हिंदी कोण होणार करोडपतीच्या ? सेटवर बिग बी च्या वाढदिवसाच्या निमित्तांने अभिजीतने खास गाण देखील गायलं. इंडियन आयडॉलचा पहिला विजेता आणि बिग बीची ही खास भेट नक्कीच अभिजीतसाठी महत्त्वपूर्ण आहे.

या खास भेटी बद्दल बोलताना अभिजीत सांगतो “आपण ज्यांचे चित्रपट बघून मोठे झालो अश्या दिग्गज अमिताभजी यांना भेटणं ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती. कोण होणार करोडपती सारख्या मंचावर जाऊन त्यांना भेटून त्यांचा वाढदिवसाच्या एपिसोड साठी गाण परफॉर्म करण हे कोणत्याही कलाकारांचं स्वप्न असत आणि मला ते करायला मिळालं हे माझं भाग्य आहे”

ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत लवकरच नव्या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून इंडियन आयडॉल च्या फॅन्ससाठी हा शो एक पर्वणी असल्याचं कळतंय.






