मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी प्रियाला वाहिली श्रद्धांजली. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री अनघा अतुलने प्रिया मराठेला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे. अभिनेत्री मानसी नाईकने देखील पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्राम स्टोरीवर हार्टब्रेकिंग असे लिहीत दुःख व्यक्त केले आहे. तर अभिनेत्री अमृता खानविलकरने हे अतिशय धक्कादायक असल्याचे म्हंटले आहे.
अभिनेत्री जुई गडकरीने इंस्टाग्रामवर श्रद्धांजली वाहिली असून अभिनेत्री दीप्ती दळवीनेही तिच्या आठवणी नमूद केल्या आहेत.
दिगंबर नाईकने सोशल मीडियावर प्रिया तू आठवणीत राहशील म्हणत शांतनूचे सांत्वन केले आहे. तर अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने ही श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकरने ही प्रिया सोबत आठवणी शेअर केल्या आहेत.