फोटोंमध्ये, ऐश्वर्या राय प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या डार्क निळ्या रंगाच्या पँटसूटमध्ये दिसत आहे. तिचा परिधान केलेला फॉर्मल आणि ग्लॅमरस दोन्ही आहे.
ऐश्वर्याने सोनेरी लेपल्ससह स्ट्रक्चर्ड ब्लेझर आणि हायवेस्टेड आणि वाईड लेग ट्राऊजर घातले आहे. ज्यामुळे तिचा सुंदर लुक अधिक आकर्षक दिसतोय आणि ब्लेझरखाली, तिने पांढरा कॉलर असलेला शर्ट घातला होता. तिची ही स्टाईल कमालीची मनमोहक दिसतेय
ऐश्वर्याने आपल्या पँटसूटसह Accessories ने हा लुक अधिक ग्लॅम केलाय. ब्लेझरवर तिने लाँग चेन पेंडंट आणि खांद्यावर एक फ्लोरल ब्रोच लावले आहे, ज्यामुळे अधिक फेमिनाईन टच दिसतोय. यासह तिने डार्क शूज घातले असून संपूर्ण लुक Polished दिसतोय
तिचा मेकअप नेहमीप्रमाणे क्लासी आणि ग्लॉसी होता. विंग्ड आयलायनरसह डिफाईंड आयब्रो केल्या आहेत आणि रोझी चिक्स आणि न्यूड ग्लॉसी लिपस्टिक लावत आपला लुक अधिक पॉवरफुल केलाय
हेअरस्टाईल करताना तिने केस एका बाजूने वेव्ह्ज करत सोडले आहेत, जे तिच्या लुकला ग्लॅमरचा तडका लावत आहेत. तिचा हा लुक पाहून चाहते वेडे झाले आहेत
ऐश्वर्याच्या पँटसूट लूकने तिने केवळ तरुण पिढीला प्रेरणा दिली नाही तर तिचे वय म्हणजे नुसतं मोजण्याइतकंच राहिलं आहे हेदेखील सिद्ध केले. प्रत्येक फोटोमध्ये तिची सुंदरता वेड लावणारी आहे