डार्क मरून रंगाच्या साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुलून आलं आहे. प्राजक्ताने यासह स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून परफेक्ट कॉम्बिनेशन केलंय
या साडीवर प्राजक्ताने केस मोकळे सोडले असून एका बाजूला भांग काढत हेअरस्टाईल केली आहे आणि तिने केसांना दिलेली ब्राऊन शेड या साडीसह अत्यंत क्लासी दिसत आहे
ऑक्सिडाईज्ड चोकर, साज, मोहनमाळ, कानातले आणि हातात नागाचा आकार असणारा दंड, अंगठी, तर माणिक लावलेला कंबरपट्टा आणि हातात ऑक्सिडाईज्ड बांगड्या असा श्रृंगार प्राजक्ताने केलाय
या संपूर्ण श्रृंगारावर तिने नाकात घातलेली ऑक्सिडाईज्ड नथ ही चारचाँद लावतेय. प्राजक्ताचा हा लुक नथीमुळे अधिक उठावदार झाल्याचे दिसून येत आहे
प्राजक्ताने या साडी आणि दागिन्यांच्या लुकसह कपाळावर चंद्रकोर लावली आहे आणि तिचा हा मराठमोळा लुक पहातच राहण्यासारखा आहे
या संपूर्ण साडीच्या लुकसह तिने न्यूड मेकअप निवडला असून फाऊंडेशन, कन्सीलर, ब्राऊन आयशॅडो, काजळ, लायनर आणि न्यूड लिपस्टिक शेडचा वापर केला आहे