तेजस्विनी नेहमीच आपल्या सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते आणि आता तिने गुलाबी साडीतील फोटो पोस्ट केले आहेत
तेजस्विनीचा हा लुक चाहत्यांच्या हृदयात नक्कीच घर करताना दिसून येत आहे. फ्लोरल प्रिंट असणारी गुलाबी साडी तेजस्विनीच्या बांध्यावर अधिक उठावदार दिसत आहे
या साडीसह तेजस्विनीने स्लीव्हलेस व्हाईट ब्लाऊज परिधान केला आहे. साडीवर पांढऱ्या फुलांसह हा ब्लाऊज परफेक्ट मॅच होतोय
तिने या साडीसह केस सोडले असून त्यांना कर्ली वेव्ही लुक दिलाय आणि तिच्या सौंदर्यात यामुळे अधिक भर पडली आहे
या साडीसह तिने ऑक्सिडाईज्ड कानातले घातले असून हातात बांगडी आणि नाकात सुंदर चमकी घातली आहे
कपाळावर बारीकशी टिकली लावत तिने हा लुक पूर्ण केलाय आणि त्याशिवाय अत्यंत मिनिमल मेकअप करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे