अमृता खानविलकर आणि तिच्या अदा म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. नुकताच अमृताने आपला रेड ड्रेसमधील क्लासी लुक शेअर केलाय
रेड गाऊन आणि त्यावर रेड जॅकेट असा अमृताचा हा पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. अत्यंत स्टायलिश आणि कमालीचा आकर्षक असा हा लुक आहे
अमृताने या ड्रेससह मिनिमल दागिन्यांचा वापर केलाय. गोल्ड ब्रेसलेट आणि गोल्ड कानातले घालून तिने हा लुक पूर्ण केलाय
अमृताने नखांना लावलेले ब्लॅक नेलपेंटदेखील लक्ष वेधून घेत आहे. कोणत्या रंगाच्या ड्रेसवर कोणते नेलपेंट परफेक्ट आहे याची उत्तम समज अमृताला असल्याचे तिने दाखवून दिले आहे
केसांचा मधून भांग पाडत थोडासा वेव्ही लुक या ड्रेसवर अमृताने दिलाय आणि केस मोकळे सोडले आहेत. तिच्या सौंदर्यात या हेअरस्टाईलने भर पडली आहे
मिनिमल मेकअप मात्र बोल्ड डार्क रेड लिपस्टिक लावत तिने हा लुक पूर्ण केलाय. लायनर, काजळ, मस्कारा आणि जाडसर भुवया असा तिचा हा परफेक्ट लुक काळजात घर करतोय