Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुघलकालीन टेक्निकने Fabric शिवाय बनला Ambani च्या नव्या सुनेचा लेहंगा, 15,000 तास कामगिरी किंमत 1 कोटी, पाहून डोळे विस्फारतील

तुम्ही कधी कापडाशिवाय बनवलेला लेहेंगा पाहिला आहे का? अंबानी कुटुंबातील नवीन सुनेच्या लेहंग्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मुघल काळातील तंत्रांचा वापर केलेल्या लेहंग्यांची किंमत वाचून श्वासच लागेल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 20, 2026 | 11:23 AM
अंबानींच्या सुनेच्या लेहंग्याने वेधले लक्ष (फोटो सौजन्य - @jade_bymk Instagram)

अंबानींच्या सुनेच्या लेहंग्याने वेधले लक्ष (फोटो सौजन्य - @jade_bymk Instagram)

Follow Us
Follow Us:
  • अंबानींची बहीण दीप्ती साळगावकरच्या मुलाचे लग्न 
  • सुनेचा लेहंगा पाहून डोळेच दिपतील 
  • कापडाशिवाय तयार केला लेहंगा, वाचा वैशिष्ट्य 
अंबानी कुटुंबाच्या सुनांच्या ड्रेसची चर्चा प्रत्येक वेळी होते आणि आता सर्वांच्या नजरा कुटुंबातील नवीन वधूवर आहेत. तिने सिल्क, कॉटन किंवा इतर कोणत्याही कापडापासून बनवलेला लेहेंगा घातला नव्हता, तर तिने धातूच्या धाग्यापासून बनवलेला लेहेंगा घातला होता. म्हणूनच या वधूची सर्वत्र चर्चा होत आहे. ती नीता अंबानीची सून श्लोका मेहता किंवा राधिका मर्चंट नाही तर अंबानींचा भाचा साळगावकर याच्या पत्नीची सर्वत्र चर्चा आहे. तिच्या लग्नाच्या लुकची सर्वांनी प्रशंसा केली आहे.

अलीकडेच, मुकेश अंबानी यांची बहीण दीप्ती साळगावकर यांचा मुलगा विक्रम साळगावकर यांचे लग्न झाले. अंबानी कुटुंबातील महिलांनी फॅशनच्या बाबतीत कोणतीही कसर सोडली नाही, तर वधूचा अनोखा लेहेंगा सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा आहे. तो अशा अनोख्या तंत्राने बनवला गेला होता की तुम्ही कदाचित असा लेहेंगा कधीही पाहिला नसेल. डिझायनरने तपशील शेअर केल्यापासून, प्रत्येकजण त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. 

Nita Ambani: नीता अंबानींनी त्यांच्या नातीला म्हटले ‘लक्ष्मी’, हृदयस्पर्शी व्हिडिओने वेधले लक्ष

१५,००० तास काम

Shweana Poy Raiturcar चा क्लासी लुक

या लेहेंग्याचे काम इतका गुंतागुंतीचे आहे की, भरतकाम केलेला हा लेहंगा तयार करण्यासाठी १५,००० तास लागले. प्रत्येक कळी ७ ते ८ इंटरलेसिंग तंत्रांनी वापर करून बनविण्यात आली आहे. स्वारोवस्की क्रिस्टल्स, मोराचे आकृतिबंध आणि निळ्या रंगाचे रंग देखील यामध्ये वापरण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याला एक शाही लुक मिळालाय. डिझायनरचा दावा आहे की हा लेहेंगा नाही तर लेहेंगासारखा दिसणारा दागिन्यांचा तुकडा आहे. अहवालानुसार त्याची किंमत अंदाजे ₹१ कोटी सांगण्यात आली आहे. 

मुघल काळातील तंत्रांचा वापर करून बनवलेला कस्टम लेहेंगा

वधू शावियानाने डिझायनर्स मोनिका आणि करिश्मा शाह यांच्या लेबल, JADE चा कस्टम ब्राइडल लेहेंगा घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा लेहेंगा कोणताही कपडा न वापरता तयार करण्यात आला होता. लेहेंग्याच्या निर्मितीमध्ये धातूचे धागे वापरले जातात आणि कसाब नावाची ही अनोखी तंत्रं मुघल काळातील आहेत. ही तंत्रं शाही पोशाख आणि दरबारातील पोशाख तयार करण्यासाठी वापरली जात होती आणि आता ती लग्नाच्या लेहेंग्यांसाठी वापरली जात आहेत. याचा वेगळेपणा पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल

कसाब टेक्निक म्हणजे काय?

कसाब म्हणजे सोने किंवा चांदीपासून बनवलेली एक बारीक तार किंवा धागा, जी भरतकामासाठी रेशीम किंवा सुती धाग्यात मिसळले जाते. ही टेक्निक अशी आहे की, याचे सर्व काम हे हातानेच होते. ज्यामुळे गुंतागुंतीच्या डिझाइन आणि 3D प्रभाव तयार होतो. मुघल काळापासून प्रेरित आकृतिबंध, जसे की वेली, बुटा, पान पटणी आणि जाळी नमुने वापरून तयार केले जातात. कसाब अजूनही भरतकामाच्या कापडासाठी वापरला जातो, परंतु येथे डिझायनरने संपूर्ण लेहेंगा त्यातून बनवला आहे.

गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

ब्लाऊजदेखील खूप खास 

ब्लाऊजचे खास डिझाईन

वधूचा केवळ लेहेंगाच नाही तर ब्लाऊजदेखील मॅक्रॅम अभियांत्रिकी नावाच्या एका अनोख्या तंत्राचा वापर करून बनवली गेली आहे. यामध्ये, कापड विणकामकरून नव्हे तर धागे गाठी बांधून तयार केले आहेत. डिझाइन आणि रचना विविध गाठी वापरून तयार केल्या जातात, ज्यामुळे कापड मजबूत होते आणि त्याचा आकार निश्चित होतो. गाठी जितक्या घट्ट असतील तितके कापड मजबूत होते. हा ब्रायडल ब्लाऊज डीप नेक असून त्याच्या बाह्यांवरील मोती सौंदर्यात अधिक भर घालत आहेत. 

दुपट्टाही आहे क्लासी 

कसे आहे वेल

केवळ लेहेंगा आणि ब्लाऊजच नाही तर Shweana चा दुप्पटा हा रोझ गोल्ड जाळीपासून बनवला होता. हे वधूच्या लेहेंग्याच्या स्वारोवस्की क्रिस्टल्सच्या पेस्टल शेड्सने केला असून परफेक्ट चमक देण्यता आली आहे. बॉर्डरवर वक्र कट डिटेलिंग आहे, तर तळाशी मोत्याच्या टॅसल लेसमुळे त्याचा क्लासीनेस वाढला आहे. हवा जाळीबद्दल बोलायचे झाले तर, ही एक अशी डिझाइन आहे ज्यामध्ये लहान छिद्रे किंवा कटवर्क वापरण्यात येते.  याशिवाय तिच्या दुप्पट्याच्या बॉर्डरवर कटआउट डिटेलिंगसह फुलांच्या पॅटर्नने सजावट करण्यात आली होती, तर उर्वरित वेल बुटीजने सजवण्यात आला होता.

रॉयल टच असणारे दागिने 

क्लासी दागिने

लेहंग्यासह क्लासी दागिने तर पाहिजेतच आणि अंबानीची सून, शावियानाने लग्नात आकर्षक डायमंड आणि रूबी निवडले होते.  रुबी पेंडंटसह डायमंड चोकर सेट घातला होता. यासह मांग टिक्का, कानातले आणि मोठी नथही उत्कृष्ट दिसत होती. न्यूड मेकअपसह अत्यंत सुंदर अशी वधू म्हणून सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे. 

Web Title: Ambani new daughter in law shweana salgaocar wore jade lehenga rare mughal era technique with no fabric kasab details inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Ambani Family
  • fashion tips
  • lifesytle news

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच
1

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच

Lupin Pharma Innovation: भारतीय औषधनिर्मितीला नवी दिशा! ल्युपिनच्या माध्यमातून नवोन्मेषाचा प्रवास उलगडणार
2

Lupin Pharma Innovation: भारतीय औषधनिर्मितीला नवी दिशा! ल्युपिनच्या माध्यमातून नवोन्मेषाचा प्रवास उलगडणार

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी  ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क
3

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
4

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.