
पावसाळा सुरु झाला की छत्री, रेनकोट याचबरोबर इलेकट्रीक उपकरणे बॅगेत कशी न्यावी असा प्रश्न पडतो. कारण ऋतू कोणताही असो कामानिमित्त तर प्रत्येक ऋतूत बाहेर पडावं लागतं. अशावेळी अनेकांना पावसात आपला लॅपटॉप, फोन अशा गोष्टी खराब होतील असा धोका वाटू लागतो. तुम्हालाही असा धोका वाटत असेल तर खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि चिंतामुक्त व्हा.
पावसाळ्यात आपण स्वतःच्या आरोग्याबरोबरच आपल्या उपकरणांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे
आज आपण अशा काही टिप्सविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे पावसाळ्यातही तुमचा लॅपटॉप खराब होणार नाही आणि सहज सुरक्षित ठेवला जाईल
पावसाळ्यात लॅपटॉप नेहमी वॉटरप्रूफ बॅगेतून कॅरी करावा. यामुळे लॅपटॉपचे बाहेरच्या पाण्यापासून संरक्षण होते
ओलावा शोषण्यासाठी नेहमी आपल्या बॅगेत सिलिका जेल पाउच ठेवत जा
लॅपटॉपला झाकण्यासाठी नेहमी एक प्लास्टिक बॅग/कव्हर किंवा सुका टॉवेल सोबत ठेवा