वर्षाच्या शेवटी एक्सप्लोर करा भारतातील 'ही' आश्चर्यकारक ठिकाणे, नैसर्गिक सौंदर्यामुळे होईल पुन्हा जाण्याची इच्छा
डिसेंबर महिन्यातील सुट्टी आणखीनच स्पेशल करण्यासाठी तुम्ही जयपूर, उदयपूर आणि जैसलमेर सारख्या शहरांना भेट देऊ शकता. पुष्कर, अजमेर, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, चित्तोडगड, बिकानेर आणि कोटा इत्यादी ठिकाणी खूप फेमस आहेत.
निसर्ग सौंदर्य आणि थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यास जायचे असल्यास तुम्ही काश्मीरमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकता. श्रीनगरचे दल सरोवर, मुघल गार्डन, गुलमर्ग आणि सोनमर्ग इत्यादी पर्यटन स्थळे मनाला आकर्षित करतील.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याची चर्च रंगली आहे. दरवर्षी देश विदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर प्रयागराजमध्ये गर्दी करतात. घाट, स्ट्रीट फूड आणि स्थानिक संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही वाराणसीमध्ये जाऊ शकता.
राधा कृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेली प्रत्येक व्यक्ती दरवर्षी वृंदावनमध्ये जाते. तिथे गेल्यानंतर यमुना आरती आणि गोवर्धन परिक्रमा यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्क्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
चेरापुंजीचे धबधबे, डावकीची हिरवळ आणि मावलिनॉन्गचे स्वच्छ रस्ते फिरण्यासाठी पर्यटक मेघालयमध्ये जातात. पर्वतीय दृश्ये, नद्या आणि हिरवागार परिसर मनाला भुरळ पडतो.