काठापदराच्या साड्यांची या पद्धतीने घ्या काळजी
काठापदराची किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर परफ्युम, डिओ लावू नये. यामुळे साडीचा रंग आणि काठ खराब होण्याची शक्यता असते. केमिकलयुक्त रसायनांमुळे साडी तयार करण्यासाठी वापरलेली जरी काळी दिसू लागते.
कपाटातील कपड्यांना वास येऊ नये म्हणून नॅफ्थलीनच्या गोळ्या वापरल्या जातात. पण साड्यांमध्ये नॅफ्थलीनच्या गोळ्या वापरू नये. यामुळे साडीचा काठ खराब होऊन साडीचा पूर्ण लुक बदलून जातो.
अनेक महिला महागातल्या साड्या सुटकेस किंवा हॅंगरवर लावून कपाटात लावून ठेवतात. पण यामुळे साड्यांचे काठ आणि साडी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे साडी नेहमी पिशवीमध्ये किंवा साडी कव्हरमध्ये भरून ठेवावी.
काठापदराच्या किंवा हेवी वर्क केलेल्या साड्या नेहमी साडी क्वहरमध्ये ठेवाव्यात. यामुळे साडी खराब होत नाही आणि साड्यांचा रंग तसाच कायम टिकून राहतो.
काठापदराच्या साड्या कधीच पाण्याने धुवू नये. यामुळे साड्यांची शाईन निघून जाते आणि रंग फिका पडतो.