मुंबईच्या अंडरवर्ल्डवर भाष्य करणाऱ्या ‘बंबई मेरी जान’(Bambai Meri Jaan) या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) एक्सेल एंटरटनेमेंटची निर्मिती असलेली ही वेब सीरिज काल्पनिक असल्याचा दावा केला जात आहे, मात्र गँगस्टार दाऊद इब्राहिमच्या आयुष्यावर बेतलेली असल्याचं ट्रेलर बघितल्यावर जाणवत आहे. ‘बंबई मेरी जान’ची कथा प्रसिद्ध लेखक आणि 80-90 च्या दशकातील अंडरवर्ल्डचा कारभार जवळून पाहणारे क्राइम रिपोर्टर एस हुसैन झैदी यांनी लिहिली आहे.त्यावेळी मुंबईत फक्त अंडरवर्ल्डची चलती होती. एक कर्तव्यदक्ष आणि इमानदार पोलीस अधिकारी आणि त्याच्याच घरातील गुंडगिरीच्या मार्गाला लागलेला मुलगा अशी ही कहाणी या सीरिजमधून उलगडली जाणार आहे. दहा भागांची ही वेब सीरिज ‘प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 14 सप्टेंबरपासून प्रसारित होणार आहे.