सप्टेंबर महिन्यात गोव्याजवळील 'या' मन मोहक समुद्रकिनाऱ्यांना नक्की द्या भेट
गोव्याजवळील अतिशय शांत, पांढरी वाळू आणि निळेशार समुद्राचा अनुभव घ्याचा असेल तर तुम्ही वेंगुर्ला बीचला जाऊ शकता. हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे.
सिंधुदुर्गमधील तारकर्ली समुद्रकिनारा स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी प्रसिद्ध आहे. तारकर्लीचे सौंदर्य पाहून जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी समुद्र पाहण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येतात.
शांत आणि एकांताचा अनुभव हवा असेल तर तुम्ही मालवणजवळील आचरा समुद्रकिनारी जाऊ शकता. निळ्याशार पाण्यात गेल्यानंतर शरीरातील सर्व थकवा कमी होऊन जाईल.
नारळाच्या झाडांनी वेढलेला शांत किनारा पाहण्यासाठी शिरोडा समुद्र किनारा अतिशय उत्तम आहे. या समुद्रकिनारी पर्यटकांची फारशी गर्दी नसते.
मालवण किंवा गोव्यात गेल्यानंतर आतुरतेने पाहावा असा समुद्र किनारा म्हणजे देवबाग. निसर्गाच्या सानिध्यात नारळाच्या झाडांनी वेढलेला समुद्र मनाला शांतता देतो.