
... आणि पोर्तुगिजांनी फोडलेलं मंदिर शिवरायांनी पुन्हा उभारलं!
गोव्याला देशाचे फन कॅपिटल सुद्धा बोलले जाते. तेथील मज्जा मस्तीचे वातावरण, उत्तम कॅफे, समुद्रकिनारे आणि पोर्तुगीज शैलीचे चर्च आणि राहणीमान नेहमीच अनेकाना भुरळ पडतात. म्हणूनच आपल्या मित्रांसोबत एकदा तरी गोवा ट्रिप व्हावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते. मात्र, गोवा म्हणजे फक्त पार्टी मज्जा मस्ती नव्हे. अस्सल गोवा म्हणजे तेथील निसर्ग आणि ऐतिहासिक मंदिर.
गोव्यात जसे आपल्याला ऐतिहासिक चर्च पाहायला मिळतात. अगदी तसेच ऐतिहासिक आणि वर्षानुवर्ष सांस्कृतिक वारसा जपणारे मंदिरं पाहायला मिळतात. असेच एक मंदिर म्हणजे गोव्यातील नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर, ज्याचे जीर्णोद्धार स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे.
Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ; विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप
आपण सगळेच जाणतो की गोव्यात पोर्तुगीजांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात होते. याची साक्ष आजही येथील वास्तू देतात. मात्र, गोव्यात हिंदूंचे देखील अस्तित्व होते. मात्र, नेहमीप्रमाणे परकीय सत्तांचे म्हणजेच पोर्तुगीजांचे वर्चस्व वाढू लागले आणि अखेर त्यांनी मंदिरं पाडण्यास सुरुवात केली.
गोव्यातील नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर हे शिवभक्तांचे प्रमुख स्थान असून कदंब राजघराण्याचे (१२ वे शतक) कुलदैवत होते. अंदाजे 1540 मध्ये गोव्यातील पोर्तुगिज इतके माजले की त्यांनी या मंदिराची देखील नासधूस केली. हीच धार्मिक हानी थांबवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीज सत्तेला आव्हान देत, 1668 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. असे म्हणतात की महाराजांनी मूळ शिवलिंगाला नार्वे येथील नवीन मंदिरात प्रतिष्ठीत केले. एकाप्रकारे, धर्माची हानी थांबवत शिवरायांनी पोर्तुगीजांना इशारा दिला की मी माझ्या धर्माचे रक्षण करण्यास समर्थ आहे. याचीच आठवण म्हणून आजही आपल्या सप्तकोटेश्वर मंदिरात एक संस्कृत शिलालेख दिसतो, जो शिवकाळातील आहे.
हे मंदिर गोमंतकातील प्रमुख शिवालयांपैकी एक असून, याला गोव्याचे राजदैवत मानले जाते. नुकतेच या मंदिराचे गोवा सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून संवर्धन करण्यात आले आहे. तसेच, जर तुम्ही या मंदिराला भेट दिली तर यातील गाभारा गोव्याच्या पारंपारिक शैलीत आहे, ज्यामध्ये युरोपियन (पोर्तुगीज) शैलीचाही काहीसा प्रभाव दिसतो.
महत्वाची सूचना: वरील माहिती ही काही वेबसाइटच्या आधारे घेण्यात आली. या माहितीची नवराष्ट्र पुष्टी करत नाही.