V नेक आकाराच्या ब्लाऊजवर उठावदार दिसतील 'या' डिझाईनचे सुंदर नेकलेस
व्ही नेकलाईनवर या डिझाईनचे सिंगल पेंडेंट शोभून दिसते. अनेकांना गळ्यात जास्त दागिने घालायला आवडत नाही. अशावेळी नाजूक साजूक पेंडेंट असलेला नेकलेस सुंदर दिसेल.
प्लेन ब्लाऊजमध्ये जर तुम्हाला बोल्ड लूक हवा असेल तर शॉर्ट चोकर घालू शकता. बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे शॉर्ट चोकर नेकलेस उपलब्ध आहेत.
लेहेंगा किंवा डिझाइनर साडी परिधान केल्यानंतर त्यावर तुम्ही लेयरिंग नेकलेस घालू शकता. यामुळे तुमचा लुक मॉर्डन दिसेल. व्ही नेकलाईन असलेल्या ब्लाऊजची निवड केल्यानंतर त्यावर शोभतील असे दागिने परिधान केल्यास लुक सुंदर दिसेल.
लग्न समारंभ किंवा सणावाराच्या दिवसांमध्ये साडी नेसल्यानंतर तुम्ही टेम्पल दागिने घालू शकता. टेम्पल दागिन्यांमधील शॉर्ट नेकलेस कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसेल.
मिनिमलिस्ट लूकसाठी छोट्या पेंडंटसोबतच तुम्ही गोल्ड किंवा डायमंड चेन असलेला नेकलेस घालू शकता. यात तुमचा लुक मिनिमल दिसेल.