रक्षाबंधनाला अंगणामध्ये सुंदर रांगोळी डिझाइन
रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील अंगणामध्ये राखीची डिझाइन काढून तिच्या आजूबाजूने सुंदर पांढऱ्या रंगाची रांगोळी वापरून डिझाइन काढू शकता. ही रांगोळी खूप आकर्षक आणि उठावदार दिसते.
फुलांची रांगोळी दरामध्ये अधिक उठावदार दिसते. यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या, झेंडू आणि गोंड्याच्या फुलांचा वापर करू शकता.
घरातील अंगणामध्ये किंवा दारात रांगोळी काढल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे तुम्ही पेन किंवा रांगोळी टूल्सचा वापर करून सुद्धा छान रांगोळी काढू शकता.
कमीत कमी वेळात सुंदर आणि उठावदार रांगोळी काढायची असेल तर तुम्ही या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी काढू शकता.
चाळणीच्या सहाय्याने रांगोळी काढून त्यात रक्षाबंधन निमित्त छानसा संदेश तुम्ही रांगोळीमध्ये लिहू शकता. ही तुमच्या भावंडाना नक्की आवडेल.