हिवाळ्यात काजू खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे (फोटो सौजन्य: iStock)
हृदयाला ठेवते चांगले: काजूमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात आणि खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात.
पचनक्रिया सुधारते: काजूमध्ये अनेक प्रकारचे फायबर आढळतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. फायबर पचन प्रक्रिया सुरळीत करते, बद्धकोष्ठता दूर करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
वेट लॉससाठी फायदेशीर: काजूमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण चांगले असल्याने ते तुम्हाला दीर्घकाळ पोटभर ठेवतात. तथापि, काजूमध्ये कॅलरीज देखील जास्त असतात, म्हणून ते संतुलित प्रमाणात सेवन करणे महत्वाचे आहे.
हाडं होतात मजबूत: काजूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे हाडे आणि दात मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावतात.
त्वचेसाठी फायदेशीर: काजूमध्ये झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. हे घटक त्वचा मऊ आणि चमकदार बनवतात, सुरकुत्या कमी करतात आणि अकाली वृद्धत्वापासून त्वचेचे संरक्षण करतात.