गुलाब : त्वचेचा दाह होत असल्यास गुलाबपाणी फायदेशीर आहे. जर तुम्हाला पित्त वाढलं असल्यास गुलकंद खाल्याने फरक पडतो.
पारिजात़:सांधेदुखी किंवा सर्दी-खोकल्यावर पारिजात़ाची फुलं रामबाण उपाय आहेत. या फुलांचा चहा प्यायल्याने प्रतिकारकशक्ती वाढते.
कमळ : मानसिक ताण असल्यास किंवा त्वचा रोग झाल्यास कमळाच्या फुलांचा काढा उपयुक्त आहे. यानेमानसिक शांतता आणि पचनशक्ती सुधारते.
शेवंती: डोळ्यांसाठी फायदेशीर आणि थकवा कमी करतो, शांत झोप लागते.त्यामुळे शेवंतीच्या फुलांचा काढा नक्की प्या.
जास्वंद : केसगळतीवर जास्वंदाचं फुल फायदेशीर आहे. जास्वंदाच्या फुलाचं तेल केस गळती कमी करतं. जास्वंदीच्या फुलांना काढा रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.