बॉलिवूडचा तो भयपट ज्याला पाहून आजही येतो अंगावर काटा, 16 वर्षांपूर्वी झाला होता प्रदर्शित
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा एका चर्चित भयपटाविषयी सांगत आहोत ज्याने आजवर अनेकांची झोप उडवली आहे. त्या चित्रपटात अशी अनेक दृश्ये होती, जी पाहिल्यानंतर कोणाचाही आत्मा हादरेल
या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने मूळ बजेटच्या तुलनेत दुप्पट कमाई केली. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की आजही टीव्हीवर हा चित्रपट लागला की लोक तो आवडीने पाहू लागतात
तर आम्ही 2008 मध्ये रिलीज झालेल्या 1920 चित्रपटाबद्दल बोलत आहोत. याला मिळालेल्या भरगोस यशानंतर याचे अनेक सिक्वेलदेखील बनवले गेले, परंतु यापैकी कोणालाही या चित्रपटा इतकी लोकप्रियता मिळाली नाही
या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले होते. रजनीश दुग्गल, अदा शर्मा, इंद्रनील सेनगुप्ता आणि अंजोरी अलग सारखे कलाकार या चित्रपटात दिसले, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली
या चित्रपटाची कथा 1920 मधील एका जोडप्याभोवती फिरते, जे आपल्या कुटुंबाशी भांडण करून लग्न करतात आणि कामानिमित्त पालनपूरला जाऊन राहतात. मात्र पालनपूरला एक आत्मा लिसावर ताबा घेतो आणि तिथून तिचा या आत्म्याशी संघर्ष सुरू होतो
चित्रपटात अनेक भीतीदायक दृश्ये आहेत जी तुम्हाला घाबरवून सोडतील. विकिपीडियानुसार, या चित्रपटाचे बजेट 7 कोटी होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर 14.5 कोटींची कमाई केली