भारती आणि हर्षने साजरी केली लग्नाची 8th Anniversary (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारती सिंग आणि तिचे कुटुंब हे चाहत्यांमध्ये खूप आवडते कुटुंब आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया सोबत, लक्ष्य देखील व्हीलॉगद्वारे चाहत्यांशी जोडलेला राहतो आणि चाहत्यांचे मनोरंजन करतो.
फोटोशूट दरम्यान हर्ष लिंबाचियाने भारती सिंगवर प्रेमाचा वर्षाव केला. कॉमेडियनने पोज देताना तिचा बेबी बंपही दाखवला. लोकांना ही जोडी खूप आवडली आहे.
भारती सिंग बॉडीकॉन ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तसेच फोटोशूट दरम्यान तिचा मुलगा गोलूचा आनंदही पाहण्यासारखा होता. त्याने त्याच्या आईवर आणि बाळावर प्रेमाचा वर्षाव केला.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या ८ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना भारती सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "८ वर्षांपूर्वी या दिवशी गोले आणि काजूच्या आई-वडिलांचे लग्न झाले होते."
भारती सिंग, हर्ष लिंबाचिया आणि गोल्याचे फोटो पाहून चाहते खुश झाले आहेत. तिघांच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. भारती सिंगने हे फोटो एका व्हिडिओसह सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.