करण आणि आयुष झाले बिग बॉसच्या घराबाहेर! (फोटो सौजन्य - Social Media)
तर करण सोनवणे आणि प्राजक्ता शुक्रेविषयी सारख्याच चर्चा सुरु होत्या. करण सोनावणे तर त्याच्या भावनांची कबुलीही अप्रत्यक्षपणे प्राजक्ताला दिली होती.
आयुष संजीव आणि करण सोनावणे, हे दोन स्पर्धक बिग बॉस सुरु होण्याच्या अगोदर पासूनच बहुचर्चित होते. पण यांचा खेळ आज इथेच संपत आहे.
आयुष संजीव आणि करण सोनावणेने बिग बॉसच्या घरातून एक्सिट घेतली आहे. त्यांच्या घरातून निघण्याने तन्वी कोलते आणि प्राजक्ता शुक्रे तसेच इतर सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
आयुष संजीव आणि तन्वी कोलते, हे नुकतेच लव्ह एंगलमुळे घरातल्या सदस्यांनाकडून ट्रॉल होत होते पण त्या दोघांनी ही निव्वळ मैत्री असल्याचे सांगितले.
आता पुढच्या आठवड्यात टांगती तलवार कुणावर? असा प्रश्न एकंदरीत उपस्थित राहिला आहे.