sana sultan nikah photos
'बिग बॉस ओटीटी 3' फेम आणि टिव्ही अभिनेत्री सना सुलतानचे लग्न झाले आहे. अभिनेत्रीने लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत आपल्या चाहत्यांना सुख:द धक्का दिला आहे.
सनाने लग्नामध्ये पारंपारिक पांढरा शरारा परिधान केला होता, या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीला नववधूच्या लूकमध्ये पाहून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना प्रेम सत्यात उतरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने लग्न भारतात लग्न केलं नसून मुस्लिम बांधवांचे पवित्र मानल्या जाणाऱ्या मदीनामध्ये लग्नगाठ बांधली आहे.
मोहम्मद वाझिद नावाच्या व्यक्तीसोबत अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने आपल्या पतीचा चेहरा फॅन्सला दाखवलेला नाही.
'बिग बॉस ओटीटी 3' फेम सना सुल्तान अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे.