अनेक बॉलीवूड कलाकार असे आहेत जे आज नावारुपाला आले असले तरी ते करियरच्या सुरुवातीला चाळीत राहायचे. अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं की, करियरच्या सुरुवातीच्या काळात ते मुंबईतल्या 10 बाय 10 च्या घरात राहत होते.
कश्मीर फाईल्स आणि असे बरेच सिनेने हीट झालेले अभिनेता अनुपम खेर हे देखील त्यांच्या संघर्षाच्या काळात चाळीत राहायला होते.
बॉलीवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ज्याची ओळख आहे असे अभिनेता मनोज वाजपायी त्यांच्या करियरच्य़ा सुरुवातीला चाळीतील एका खोलीत 10 जणांबरोबर राहत होते.
आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांना खळखळून हसायला लावणारे अभिनेता जॉनी लिव्हर यांचं बालपण मुंबईतल्या चाळीत गेलं. एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं होतं.
विनोदी अभिनेता अर्शद वारसी हा मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आला आहे. अर्शदने सांगितलं की, तो देखील कुटुंबासोबत चाळीत राहायचा.
बॉलीवूडचा नावाजलेला दिग्ददर्शक मधुर भांडारकर हे देखील आधी चाळीत राहत होते.
अभिनेता गोविंदा यांना उत्तम मराठी बोलता येतं, याबाबत त्यांनी एकदा मुलाखतीत सांगितलं होतं की, ते विरारला चाळीत राहत होते म्हणूनच त्यांना मराठी बोलता येतं.