‘बॉईज ३’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुण्यात भव्य दिव्य म्युझिकल सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमात अवधूत गुप्ते सह अनेक गायकांचा सहभाग होता तसेच नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढली.
‘लग्नाळू’, ‘गोटी सोडा’ ही गाणी डान्स, पार्टी अँथम बनली असून आताच नवीन आलेल्या ‘लग्नाळू २.०’ ने पुन्हा एकदा सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावत आहे.
विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ३’ चित्रपटातील गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ हा चित्रपट १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.