लग्नासाठी खरेदी करा 'या' रंगाचा ब्रायडल लेहेंगा
लग्नाच्या दिवशी ग्लॅमरस लुक हवा असेल तर तुम्ही गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान करू शकता. या लेहेंग्यात तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.
मस्टर्ड येलो आणि फॉरेस्ट ग्रीन हे दोन रंग एकाच लेहेंग्यात खूप सुंदर दिसतात. तुम्हाला जर इतरांपेक्षा थोडा वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही या रंगाचा लेहेंगा ट्राय करू शकता.
लाल रंग सगळ्यांचं खूप आवडतो. तुम्हालासुद्धा लाल रंगाचा लेहेंगा लग्नात हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान करू शकता.
लग्नात जर तुम्हाला रॉयल आणि थोडा हेवी लुक हवा असेल तर तुम्ही डार्क रंगाचा लेहेंगा लग्नात परिधान करू शकता. यामध्ये तुम्ही अधिक सुंदर आणि उठावदार दिसाल.
हल्ली सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड येत आहेत. त्यात पेस्टल शेड्स असलेले लेहेंगे मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहात. पारंपरिक रंगांव्यतिरिक्त काहीतरी नवीन हवं असेल तर तुम्ही हे शेड्स नक्की ट्राय करू शकता.