घरात किती पैसे ठेवता येतात, वाचा... काय आहे नियम? (फोटो सौजन्य - istock)
अनेकांना प्रश्न - देशातील अनेकांना असा प्रश्न पडला आहे की आपण घरात किती रक्कम ठेऊ शकतो? आपण भारतात याबाबत काय नियम आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
किती पैसे ठेवता येतात? - आपल्या घरात किती पैसे ठेवायचे, याबाबत कोणतेही बंधन नाही. तुम्ही लाखो करोडो रुपये घरात ठेऊ शकतात. मात्र, घरात पैसे असले तरी तुम्ही अडचणीत सापडू शकतात. याबाबतचा नियम जाणून घेऊयात.
पैशांची संपूर्ण माहिती हवी - तुम्ही कितीही रक्कम घरात ठेऊ शकतात. मात्र, या पैशाची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे हे पैसे कुठून आले? कुणी दिले? ही माहिती असणे गरजेचे आहे.
कागदपत्रे असणे आवश्यक - घरात असलेल्या पैशांची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. जर आयकर विभागाने तुमच्या घरावर धाड टाकली आणि त्यात तुमच्याकडे पैसे सापडल्यास ते तुमच्याकडे कसे आले. याचा पुरावा सादर करावा लागेल.
पुरावा नसल्यास कारवाई होणार - तुमच्या घरात पैसे सापडले आणि त्याचा पुरावा तुमच्याकडे नसल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे सर्व पैसे जप्त होऊ शकतात. तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.