यकृतामध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा आलं पुदिन्याच्या पाण्याचे सेवन
आल्यामध्ये असलेले जिंजेरॉल आणि शोगाओल सारखे बायोएक्टिव्ह घटक लिव्हरमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय नियमित आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
पुदिन्याची पाने पचनसंस्था सुधारण्यासाठी गुणकारी ठरतात. या पानांचे नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात वाढलेले पित्त कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
साथीच्या आजारांमुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आलं आणि पुदिन्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
गॅस, अपचन आणि पोटदुखीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी पुदिन्याची पाने आणि आल्याचा रस मिक्स करून प्यावा. यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आलं आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म शरीर हायड्रेट आणि निरोगी ठेवतात.